काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज 8 वी पुण्यतिथी आहे. गावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री हा त्यांंचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरतो, आपल्या कामासोबतच विलासराव यांंच्या हसर्या व्यक्तीमत्वाने त्यांची एक वेगळी ओळख बनवली होती.
अभिनेता रितेश देशमुख याने वडिलांंची आठवण काढत एक पोस्ट केली आहे. लोकांतील, लोकांचा, लोकनेता असे म्हणत वडिलांची आठवण काढत रितेश ने विलासराव यांंचे एक सुंदर कॅरिकेचर शेअर केले आहे, ज्याला कॅप्शन देताना, तुमच्या हास्याने जग बदला पण जगाला तुमचंं हासु बदलु देउ नका असा सल्ला रितेश देत आहे.
Use your smile to change the world, don’t let the world change your smile. #स्मृतिदिनी Miss you PAPPA!! pic.twitter.com/nXvatZeGSY
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 14, 2020
रितेश प्रमाणेच विलासराव यांचे थोरले पुत्र आणि आमदार धीरज देशमुख यांनी सुद्धा एका व्हिडीओ मधुन वडिलांंच्या आठवणी शेअर केल्या आहेत. यापुर्वी रितेशने विलासराव देशमुख यांच्या जयंंती निमित्त त्यांच्यासारखाच पोशाख करुन एक अत्यंत भावनिक व्हिडीओ पोस्ट केला होता.