सोलापूर : आज दि. 29 ऑक्टोंबर 2020 रोजीच्या बैठकीनुसार सोलापूर येथील बोरामणी विमानतळासाठी अतिरिक्त 29.94 हे.आर. खाजगी जमिन संपादनासह एकूण सुमारे 580 हे. जमिन संपादनास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त 29.94 हे.आर. खाजगी जमिन संपादनापोटी होणाऱ्या रु. 46.29 कोटी अतिरिक्त खर्चासह एकूण रु. 122.79 कोटी खर्चास सुधारित वित्तीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
याबाबत अतिरिक्त भुसंपादनासाठी आवश्यक रकमेपैकी रु. 40.00 कोटी निधी सन 2020-21 या आर्थिक वर्षात तरतुदीत वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडे सतत बैठक आयोजित केली होती. यानुसार शासन निर्णय क्र. मविवि-1619/प्र.क्र.55/28-अ, दि. 29 ऑक्टोंबर 2020 रोजी विमानतळाच्या भुसंपादनासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता मिळाली आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश
थैलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, अनिमिया रक्तविकार हा अनुवंशिक आजार असल्यामुळे या रुग्णांना दर 15 ते 20 दिवसाला बाहेरून रक्त द्यावे लागते. सतत रक्त दिल्याने सदर रुग्णांच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढते यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होते. यामुळे त्यांना सतत औषधांची आवश्यकता असते. परंतू सदरचे औषधे महाग असल्यामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहतो. यामुळे समवेदना मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे सोलापूर येथील श्री. छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये औषधे उपलब्ध करून देण्यात यावे याबाबत मागणी करण्यात आली होती.
यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी श्री. छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे थैलेसेमियाचे औषधे उपलब्ध करून दिले व सदर रुग्णांना श्री. छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे औषधोपचार व मोफत औषधे देण्यास सुरुवात करण्यात आली असून आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते औषधे वाटप करण्यात आले.
Read Also
राज्यपालांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा शरद पवार यांना फोन…https://t.co/wOsOnIqTwL#RajThackarey #SharadPawar #NCP #MNS @RajThackeray @PawarSpeaks @mnsadhikrut @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020