मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून दौऱ्यामध्ये व्यस्त असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांनी स्वतः ट्विट करत यांची माहिती दिली होती. मात्र, फडणवीस हे करोना झाल्याचं नाटक करत असल्याचं एकानं म्हटलं होतं.
एका नेटकऱ्यानं फडणवीस बिहारच्या निकालामुळे नाटक करत असल्याचं ट्विट केलं होतं. त्यावरून आमदार रोहित पवारांनी त्याचे कान टोचले. “देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं. त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही” असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले,“देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं. त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे. दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत,”
देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं, त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे.
दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत. https://t.co/K04fKRjkIk— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 25, 2020