पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला विळखा घातले आहे. अशा परिस्थिती काल गोव्यात ऑक्सिजन गळतीमुळे झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यापूर्वी नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन गळती झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठ्या अभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी चालून आली आहे. भाजपच्या वाचाळ नेत्यांनी ताबडतोब गोव्याला जाऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी. प्रवासाचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत, असा टीका राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरून केली आहे.
साऊथ गोवामधील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती लागली. त्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. ऑक्सिजन टँक गळतीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत ऑक्सिजनची गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु होते. यादरम्यान रुग्णालय परिसरात पांढऱ्या धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं.
काल गोव्यात ऑक्सिजन गळतीमुळे अनेक रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी चालून आली आहे. भाजपच्या वाचाळ नेत्यांनी ताबडतोब गोव्याला जाऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी. प्रवासाचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 12, 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातले असताना अशा घटना घडणे हे दुर्दैवच आहे. परंतू भाजप मदतीचा हात देण्याऐवजी केवळ सुडबुद्धीचे राजकारण करत आहे. काल गोव्यात ऑक्सिजन गळतीमुळे अनेक रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मृत्यूचं राजकारण करण्याची संधी चालून आली आहे. भाजपच्या वाचाळ नेत्यांनी ताबडतोब गोव्याला जाऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करावी. प्रवासाचा खर्च आम्ही द्यायला तयार आहोत, असे त्यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. Rupali Chakankar will pay for the BJP leaders’ trip to Goa
An unfortunate incident took place in Goa yesterday when an oxygen leak killed several patients. BJP leaders in Maharashtra have an opportunity to do politics of death. The talkative leaders of the BJP should immediately go to Goa and demand a presidential rule. We are willing to pay for the trip.
#WATCH Oxygen tank leakage at South Goa District Hospital; fire tenders rushed to the spot. Details awaited#Goa pic.twitter.com/QmDN6JlZ0J
— ANI (@ANI) May 11, 2021
नाशिक वायूगळती- देवेंद्र फडणवीस यांची सखोल चौकशीची मागणी
मागील महिन्यात नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीतून मोठ्या प्रमाणात वायू गळती होऊन, तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. दरम्यान, या घटनेनंतर अनेक नेत्यांनी या धक्कादायक घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील, प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना, शोक व्यक्त करत या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.
What happened in Nashik is terrible. It's being said that 11 people died which is very disturbing. I demand that the other patients be helped & shifted if needed. We demand a detailed inquiry: Former Maharashtra CM and BJP leader Devendra Fadnavis on Nashik Oxygen tanker gas leak pic.twitter.com/GdLXzgGPwh
— ANI (@ANI) April 21, 2021