पुणे : दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सरकारी सर्वोतपरी प्रयत्नशील असून देखील कोरोनाचे प्रमाण वाढणे ही गंभीर बाब आहे. सरकार नेहमीच महत्वाची लोकसहभागातील कामे पार पाडण्यासाठी राज्यातील शिक्षक,अंगणवाडी सेविका आणि आशा कर्मचारी या सगळ्यांची मदत घेत असते. कोरोनाच्या काळात देखील सरकारने तेच केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आता शिक्षकांनी कोरोना काळात केलेली मदत लक्षात घेऊन सरकारकडूनही त्यांना मदतीचा हात पुढे द्यावी यासाठी राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांच्याकडे मागणी केली आहे.
महाराष्ट्रात कोविड -19 चा प्रसार सुरूच आहे, यामध्ये शिक्षक शासनाने नेमून दिलेल्या शिक्षकेतर कामातही मदत करत असतात.कोविड -19 काळातही शिक्षकांनी मदत केली त्यामध्ये अनेक शिक्षकांना संसर्ग झाला त्यात काहींचा मृत्यू ही झाला. त्यांच्या या काळातील रजेला डॉक्टरांच्या प्रमाण पत्रानुसार कोविड विशेष रजा म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी चाकणकर यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबतचे ट्विट देखील त्यांनी केले आहे.
तसेच वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती आजार यादीमध्ये कोविड-19 आजाराचा समावेश करून शिक्षकांना कोविड -19 आजारासंदर्भात वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती मिळावी यासाठी देखील आपण प्रयत्न करावेत अशी विनंती रुपालीताई चाकणकर यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
त्यांच्या या काळातील रजेला डॉक्टरांच्या प्रमाण पत्रानुसार कोविड विशेष रजा म्हणून मान्यता द्यावी तसेच वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती आजार यादीमध्ये कोविड-19 आजाराचा समावेश करून शिक्षकांना कोविड -19 आजारासंदर्भात वैद्यकीय बिल प्रतिपूर्ती मिळावी, (2/3)
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 13, 2020
Read Also
शिवसेनेचे मोठे नेते हॉस्पिटलमध्ये दाखल, उद्धव ठाकरेंनी बैठक केली रद्दhttps://t.co/MIXVyuvLcq @CMOMaharashtra @uddhavthackeray
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 13, 2020