मुंबई – बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर महाविकास आघाडीवर भाजपकडून टीका होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे विकासक धार्जिणे असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. या टीकेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले जात आहे. ट्विटरवर तर खास काव्यात्मक शैलीमध्ये एकमेकांवर प्रहार केले जात आहेत.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उघड डोळे बघ नीट केशवा, तुझा शब्दच्छल आहे फसवा, समाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय, महाविकास आघाडी ‘छे आपडा’ असे सांगत केशव उपाध्येंना उत्तर दिले आहे. तसेच, ट्विटरच्या माध्यामातून सचिन सावंत यांनी हे सरकार अजब नसून, गजब असल्याचा दावा केला आहे.
“उघड डोळे बघ नीट केशवा, तुझा शब्दच्छल आहे फसवा अरे अजब नव्हे, गजब आहे हे सरकार, नाठाळांच्या माथी धोंडा अन् जनतेला मणिहार मोदी कृपेने करोडो झाले बेरोजगार भाजपासाठी बिल्डर असे मलिदा, आमच्यासाठी बांधकाम क्षेत्र जनतेला रोजगार समाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय, मविआ छे आपडा” असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.
उघड डोळे बघ नीट केशवा,
तुझा शब्दच्छल आहे फसवा
अरे अजब नव्हे, गजब आहे हे सरकार,
नाठाळांच्या माथी धोंडा अन्
जनतेला मणिहार
मोदी कृपेने करोडो झाले बेरोजगार
भाजपासाठी बिल्डर असे मलिदा, आमच्यासाठी बांधकाम क्षेत्र जनतेला रोजगार
समाधानी आज राज्यातला बापडा,
म्हणतोय, मविआ 'छे आपडा' 😀 https://t.co/ktnePDha9y— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 7, 2021