मुंबई : अभिनेत्री कंगना आणि राज्य सरकारमध्ये अजूनही राजकीय संघर्ष सुरुच आहे. भाजपकडून कंगनाला पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. यावर काँग्रेसचे पप्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या कंगनाची भाजपला फारच चिंता आहे. कंगना आणि भाजप एक असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या गद्दार भाजपाईंना धडा शिकवला पाहिजे.”, असा हल्लबोल सावंत यांनी केला आहे.
दरम्यान अभिनेत्री कंगनाचा अद्यापही ट्विटर वॉर सुरूच आहे. मुंबईच्या राजकीय नाट्यानंतर ती आपल्या घरी हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. मात्र तरीही तिती ट्विटरवरून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असल्याचे दिसत आहे. भाजपला कंगनाचा पाठिंबा मिळाल्याने ती भाजपमध्ये प्रवेश करणार का या चर्चांना उधाण आले आहे.