मुंबई : महाराष्ट्रात राज्यपालनीयुक्त १२ जागांसाठी सध्या अनेक नावांची चर्चा सुरु आहे, त्यात दररोज नवनवीन नाव चर्चिले जात असताना आता महाविकास आघाडीच्या या अशा कारभारावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार कोडे ओढत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे, राज्यसभा उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला, आता म्हणे विधान परिषदेवरही दुसऱ्या पक्षातील पडेल उमेदवाराची आयात होणार…सत्तेचे अस्तित्वही दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर, आणि साहेबांना घरी बसल्या बसल्या दिल्लीची स्वप्न पडतात….असं ट्विट करत त्यांनी पवारांवर टीका केली आहे.
राज्यसभा उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला, आता म्हणे विधान परिषदेवरही दुसऱ्या पक्षातील पडेल उमेदवाराची आयात होणार…
सत्तेचे अस्तित्वही दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर,
आणि साहेबांना घरी बसल्या बसल्या दिल्लीची स्वप्न पडतात….🤓— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 31, 2020
महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी १२ नावांची शिफारस महाविकास आघाडी सरकार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करणार आहे, यातील बहुतांश उमेदवार हे बाहेरून आयात केलेले असणार कि स्वपक्षातील असणार याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही त्यामुळे अनेक चर्चावितर्क सुरु आहेत, त्यातच आता आमदार अतुल भातखळकरांच्या या टीकेमुळे सरकारला या विषयावर रोषाला समोर जावं लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसकडून अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकरांना संधी मिळणार अशी चर्चा सुरु असताना आता त्यांचं नाव शिवसेनेकडून घेतल जात आहे. कारण काँग्रेसचा हा उमेदवार आता शिवसेनेचा आमदार बनणार आहे. त्यासंबंधीची ऑफर शिवसेनेकडून मातोंडकरांना देण्यात आली होती. त्यांनी ती स्वीकारली असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद चव्हाट्यावर आले होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून जोरदार चिमटे काढले होते. आता महाराष्ट्र सरकार पाठवत असलेल्या १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Read Also :
एका रंगीला मुळे शिवसेनेची उलटी दौड सुरू झाली आहे, निलेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोलhttps://t.co/5l0lGzIK2X @BJP4Maharashtra @meNeeleshNRane @ShivSena @rautsanjay61
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020