संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना व्हारयसच्या लसींवर जगभरात अनेक इन्स्टिट्युटमध्ये लस बनवण्याचे काम सुरु आहे. त्याप्रशवभूमीवर भारताला देखील यावरील लस बनवण्यात येत आहे. केवळ भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना अशी परवडणारी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेनं आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आता आणखी एक पाऊल उचलत हि लस कमी किमतीत उपलध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सीरम इन्स्टिट्युटने GAVI या आंतरराष्ट्रीय लस संस्थेशी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी भागीदारी केली आहे. जवळपास 100 दशलक्ष डोस पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही संस्था मिळून भारतासह इतर गरीब देशांसाठी 2021 पर्यंत 100 दशलक्ष कोरोना लशीचं उत्पादन करतील. या लशीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजे फक्त 225 रुपये असेल. यासाठी गेट्स फाऊंडेशन 150 मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे.
कोरोनाव्हायरसवरील लस येईपर्यंत पुढचं एक वर्ष मास्क हा तुमच्या पेहरावाचा आणि सौंदर्याचा भाग बनवून घ्या. कोरोना विषाणूसोबतचा लढा वैयक्तिक स्तरावर लढण्यासाठी एक ते दीड मीटर अंतर ठेवा आणि नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबणाने धुवून घेतल्याचं सुनिश्चित करा. शिवाय ज्यांना रक्तदाब सारखे आजार आहेत त्यांनी जास्त घराबाहेर पडू नये”, असा सल्ला पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी याआधी सांगितले होते.