औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. खैरेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला.
चंद्रकांत खैरे यांच्या निष्ठावंत समर्थकांनी मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात हे प्रवेश झाले. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते. निवडणुका तोंडावर असताना मनसेने मोर्चेबांधणी सुरु केलेली दिसत आहे.