मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही धमकीचे फोन आले आहेत. तर अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणी भाष्य केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
हे फोन कोणाकडून आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या तीन प्रमुख नेत्यांना धमकीचे फोन आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे काल समोर आले होते. आता, शरद पवार यांनाही काल भारताबाहेरुन धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Read Also
CM ठाकरेंना आलेल्या फोनचा NIA कडून तपास करा,’या’ मनसे नेत्याने केली मागणीhttps://t.co/DqplLecsY3@SandeepDadarMNS @mnsadhikrut
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 7, 2020