‘शरद पवार हे देशातील एक प्रमुख नेते आहेत. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता पवार यांच्यात आहे. दांडगा अनुभव, देशाच्या प्रश्नांची जाण आणि खंबीरपणा या सर्वच गोष्टी पवार यांच्याकडे आहे’, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. यूपीएच्या अध्यक्ष पदासाठी शरद पवार यांचे चर्चेत आल्यानंतर राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली.
शिववसेना पक्ष सध्यातरी संयुक्त पुरोगामी आघाडीचा सदस्य नाही. त्यामुळे यूपीए अध्यक्षपदाबाबत मी अधिक बोलू शकणार नाही भविष्यात राजकारणात काय होईल, हे आताच सांगता येणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शरद पवारांची भूमिका, त्यानंतर कृषी कायद्याविरोधात राष्ट्रपतींची भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार यांचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.