मुंबई : आखाती देशातील अनिवासीय मराठी भारतीयांच्या विविध संघटनांनी आज शरद पवार यांच्याशी ऑनलाईन मीटिंगद्वारे संवाद साधला. ऑनलाईन संवादात शरद पवार यांनी त्यांच्या समस्यांसंदर्भात व त्यांना ‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळून आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीच्या योजनांसंबंधी देखील चर्चा केली.
नव्या संकल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्ट-अप उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक सहाय्य आणि शासन कामकाजात संधी देऊन प्रोत्साहन देते. नवउद्योजकांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सिडबीच्या सहयोगाने व्हेन्चर कॅपिटल सुविधाही उपलब्ध असल्याचे शरद पवार यांनी त्यांना सांगितले.
नव्या संकल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्ट-अप उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक सहाय्य व शासन कामकाजात संधी देऊन प्रोत्साहन देते. नवउद्योजकांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सिडबीच्या सहयोगाने व्हेन्चर कॅपिटल सुविधाही उपलब्ध असल्याचे त्यांना सांगितले.@GmbfGlobal pic.twitter.com/DxyeiiRlZx
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 3, 2020
अनिवासीय मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारने ईझ ऑफ डुईंग बिझिनेस अंतर्गत तात्काळ एकल परवाना (महापरवाना), जागेची सहज उपलब्धता, गुंतवणूक रकमेइतका परतावा, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच महिला उद्योगांसाठी वाढीव प्रोत्साहन योजनांची माहितीही शरद पवारांनी त्यांना दिली.
महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत. त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासीय भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय राज्यात स्थापित करू शकतात व त्याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतील.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 3, 2020
आखाती देशांमधून परत आलेल्या अनिवासीय भारतीयांच्या कौशल्याचा आणि अनुभवाचा कशाप्रकारे उपयोग करुन घेता येऊ शकेल महाराष्ट्र राज्य हे औद्यागिक विकासात नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. इथे अनेक नामवंत उद्योग समूहांचे मोठे प्रकल्प आहेत. अनिवासीय भारतीयांना त्यांच्या कौशल्यानुरुप अनेकविध रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, असेही शरद पवार म्हणाले.
तसेच, परतणाऱ्या निवासीय भारतीयांसाठी महाराष्ट्र सरकारच्या महाजॉब्स पोर्टलवर अनिवासीय भारतीयांच्या नोंदणीसाठी योजना, त्यांच्या मुलांसाठी स्थानिक शाळांमध्ये राखीव जागा तयार करता येऊ शकतील का ? शेतीपूक उद्योग, बाजारपेठा अशा विविध विषयांबाबत यावेळी चर्चा झाली.