अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. क्त, सक्षम आणि निष्पक्ष तपास ही काळाची गरज असल्याचे नमूद करतानाच, हा तपास सीबीआयला सोपवण्यास मान्यता देण्यासाठी बिहार सरकार पात्र आहे, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2020
सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी ट्विट केले की, सर्वोच्च न्यायालयानं सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल.
यानंतर त्यांनी सीबीआयवर निशाणा साधत आणखी एक ट्विट केले. त्यांनी लिहिले की, मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अज्ञानाधारित शोषणाविरूद्ध कडवी झुंज देणारे विज्ञाननिष्ठ विचारवंत, आपल्या साहित्याच्या माध्यमातून गैरसमजुती, धार्मिक रूढी आणि परंपरांवर आसूड ओढणारे बुद्धीवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन. pic.twitter.com/K7XrLg1hcd
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2020
दरम्यान, आज डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यस्मरण दिन आहे. त्यानिमित्ताने शरद पवार यांनी ट्वीट करून अभिवादन केले आहे.