मुंबई : कंगनाच्या ऑफिसवर आज मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवायला सुरुवात केली होती. पालिकेने कंगनाला ऑफिस अनधिकृत असल्याची नोटीस काल दिल्यानंतर पालिकेने आज कंगनाच्या ऑफिसवर तोडफोड करायला सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत भाष्य केले होते.
महापालिकेची काही नियमावली आहे त्यानुसार काही केले असेल मात्र अश्या लोकांना जास्त प्रसिद्धी देऊ नका असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हंटले आहे.
कार्यालयात जी तोडफोड करण्यात आली त्यावर महापालिकेने कारवाई का केली याची माहिती घ्यावी लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. मुंबईमध्ये बेकायदेशीर बांधकामे ही फार नवीन गोष्ट आहे असे देखील नाही, त्यामुळे अशा वातावरणात कारवाई करून आपण एखाद्याला बोलण्यासाठी संधी देतोय, ठीक आहे आता ते महानगर पालिकेचे अधिकार आहेत असे परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
Read Also
महापालिका आणि राज्यातील सत्तेचा दुरुपयोगhttps://t.co/iqyykjoEjy@KanganaTeam @mipravindarekar @mybmcwardKW
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 9, 2020