पुणे : कोरोनाच्या काळात देखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे एखाद्या तरुण नेत्याप्रमाणे दौरे करताहेत आणि राज्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठका सुद्धा घेताहेत त्यामुळे सहाजिकच अनेकांना प्रश्न पडला असेल की, शरद पवार एवढ्या म्हातारपणात देखील इतकी मेहनत घेताहेत त्यांना कोरोनाची भीती वाटत नाही का ? मात्र कोरोनासाठी मी लस घेत असल्याचे स्वतः शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
आज सकाळी शरद पवारांनी दुसऱ्यांदा सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि कोरोनावर तयार होत असलेल्या लसीचा आढावा घेतला मात्र यासोबतच त्यांनी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीची बीसीजी लस घेतल्याचं देखील पत्रकार परिषदेत सांगितलं.
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशात खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे. उपाय योजानांसोबत आहारावर लक्ष देणं देखील महत्वाचं आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवन देखील महत्वाचं आहे. त्याच अनुषंगाने रोगप्रतिकारण क्षमता वाढवण्यासाठीही लस शरद पवार यांनी सिरम येथे घेतल्याचे समजते. तसेच आज शरद पवार यांच्यासोबत असणाऱ्या स्टाफला देखील ही लस देण्यात आलीय.तर ज्या लसीची सर्वांना उत्सुकता लागली आहे ती लस जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येईल असं शरद पवार यांनी आढावा घेतल्यावर सांगितले.
Read Also
हाथरस पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही,पेट्रोल टाकून जाळलं : संजय राऊतhttps://t.co/uqBJcGxZVI#HatharasCase #SanjayRaut #Shivsena #JusticeForIndiasDaughters @rautsanjay61
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 2, 2020