शिवसेनेचे माजी महसूल राज्यमंत्री अनिल राठोड यांचे आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास निधन झाले आहे. शिवसेनेमधून 25 वर्ष आमदार म्हणून निवडून येणाऱ्या राठोड यांच्या निधनाने राजकारणावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनिल राठोड यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अनिल राठोड यांच्या अशा या अचानक जाण्याने राठोड कुटुंबियांसह शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.