डोंबिवलीमधील खड्डे सोशल मीडियावर पोस्ट करत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील.
पाटील पुढे म्हणतात पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. राजू पाटील यांच्या विधानावर आता शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना खासदाराने दिले हे उत्तर
शिवसेनेचे खासदार आणि नेते श्रीकांत शिंदे म्हणाले की, ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल, असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांना दिले आहे.
रेल्वे सेवा बंद असल्याने कल्याण शीळ रसत्यावर वाहतुकीचा ताण आहे. वेळ मिळतोय तसा पॅचवर्क, डांबरीकरणाची कामे सुरु आहेत. या रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरणाचं काम सुरु आहे. कोरोनाचं संकट असूनसुद्धा या रस्त्याचं काम बंद पडले नाही. त्याचबरोबर पाऊसही पडतोय. त्यामुळे खड्डे होत आहे. मात्र खड्डे बुजवण्याचं काम सुरु असून लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
Read this Also
‘तो’ चीन – तुर्कीचा लाडका, RSS ची आमिर खानवर कठोर शब्दात टीकाhttps://t.co/GDJNqsYI8C@RSSorg @amirkingkhan
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 26, 2020