पुणे : मागील काही दिवसात राज्यात अतिवृष्टीमुळे विविध भागात मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक पक्षाचे नेते नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. आता महाविकास आघाडीत प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने देखील बारामतीमध्ये लक्ष घातले असून, शिवसेनेच्या नेते नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे आज (19 ऑक्टोबर) बारामती, इंदापूर आणि दौड तालुक्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या कार्यक्रमाची माहिती आढळरावांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे.
शिवसेना नेत्यांनी बारामतीत लक्ष घातल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आढळरावांचा आणि मावळमध्ये शिवसेनेकडून पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. आढळराव यांच्याकडे पक्षाने उपनेतेपदाची जबाबदारी दिली आहे.