नवी दिल्ली : बिहारमध्ये ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये 3 टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना देखील बिहारच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे. आता शिवसेनेने या निवडणुकीसाठी 20 जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे.
शिवसेना बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवणार आहे. परंतु ही निवडणूक शिवसेनेला त्यांच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढता येणार नाही.
शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी आणि अशोक तिवारी यांचा समावेश आहे.