मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागणी झाली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी शिंदे यांनी करोनाची चाचणी केली होती त्यानंतर आजच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
काय म्हणालेत एकनाथ शिंदे नेमकं ट्विटमध्ये
“काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती”.
काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2020
राज्यात बुधवारी दिवसभरात २१ हजार २९ करोना रुग्णांची नोंद झाली. तर दुसरीकडे १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. यासोबत राज्यभरात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० वर पोहोचली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्के इतके झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Read Also
निलेश राणे भाजपचे आऊटडेटेड नेते त्यांना कवडीचीही किंमत नाही-शिवसेनाhttps://t.co/kBMCIqNls1#NileshRane #CMuddhavthackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020