मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हावर शिवसेनेला समाधान मानावं लागलं. पण मध्य प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना धनुष्यबाण या आपल्या पारंपरिक चिन्हासह उतरणार आहे. तशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला निवडणूक आयोगानं सुरुवातीला बिस्किट हे चिन्ह दिलं होतं. त्याला शिवसेनेनं आक्षेप घेतला. त्यानंतर शिवसेनेला साजेसं ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळालं आहे.
NDAतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी ५० जागा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्टार प्रचारकांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई यांचा समावेश आहे.
तिकडे मध्यप्रदेशात काँग्रेसच्या २७ आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. तर एका आमदाराच्या मृत्यूमुळे मध्य प्रदेशात २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या सर्व जागांवर शिवसेना निवडणूक लढवत भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. मध्यप्रदेश पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राज्याबाहेर पक्षाची ताकद वाढवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
Read Also
बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत,मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा https://t.co/j7S3JSjqCL#CMThackarey #bollywoodDrugList #bollywoodDrugList #Shivsena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 15, 2020