मुंबई : उत्तर प्रदेशच्या हाथरास घटनेवरून योगी सरकारविरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातहि अनेक ठिकाणी आंदोलन करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यापार्शवभूमीवर शिवसेनेच्या महिला संघटनेकडून योगी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले . तसेच यूपीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क येथील सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेने तीव्र आंदोलन केले. योगी सरकार शिवसैनिक व महिला आघाडीच्या रणरागिणींनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या निषेधाचे फलक आणि भगवे झेंडे घेऊन जोरदार घोषणा दिल्या. देश का नारा बेटी पढाओ बेटी बचाओ… यूपी योगी का नारा बेटी लुटो बेटी जलाओ तसेच मुलगी बहिण, आई माता… यूपीत रावणाने जाळली माता अशी पोस्टर्स फडकावत शिवसेनेच्या रणरागिणींनी योगी आदित्यनाथ सरकारला निषेध केला.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवरील सामुहिक अत्याचार व हत्येचा तीव्र निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवाजी पार्प येथील चैत्यभूमी तसेच माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याप्रसंगी आमदार व विभागप्रमुख सदा सरवणकर, मनीषा कायंदे, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
युवासेनेच्या अधिपत्याखालील युवती सेनेच्या वतीनेही दादरच्या शिवसेना भवन येथे निदर्शने करण्यात आली. हाथरस बलात्कार घटनेबाबत उत्तर प्रदेश पोलिसांच्या अमानवी भूमिकेचा यावेळी तीव्र निषेध केला गेला. उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारचा धिक्कार केला गेला. बलात्कारपीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणीही करण्यात आली. याप्रसंगी युवा सेना कार्यकारिणी सदस्य सुप्रदा फातर्पेकर, सिनेट सदस्या शीतल देवरुखकर आणि युवती सेनेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Read Also :
जोपर्यंत लोकांच्या मनातुन जात निघत नाही तोपर्यंत दलितांवर अत्याचार होत राहतील: आठवलेhttps://t.co/ZJwIowzPpE @RamdasAthawale #HathrasHorrorShocksIndia
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 4, 2020