पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. या परिस्थितीत काय सुधारणा करता येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे शहरातील काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतलेले आहेत. नेमक्या अडचणी काय आहेत, प्रशासनाची भूमिका काय आहे आणि आपण नेमकं काय करायला हवं, या बाबतीमध्ये शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी पक्षातर्फे पुण्यातील 8 मतदार संघांमध्ये “एन सी पी पुणे सिटी कोविंड हेल्पलाइन” सुरू करावी. त्या ठिकाणावरुन रुग्णांना सर्व हॉस्पिटलची अद्यावत माहिती देण्याची व्यवस्था करावी, काही प्रमुखांवर तिची जबाबदारी देऊन त्यांनी हॉस्पिटल शी संपर्क साधून रुग्णांना दाखल करून घेणे बाबत मदत करावी. या 8 ही मतदारसंघांमध्ये सुसज्ज अशा ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा असेल, गंभीर रुग्णांसाठी या ॲम्बुलन्सचा उपयोग करावा याबाबतीतील जबाबदारी या क्षेत्रात काम केलेल्या वैद्यकीय अधिकार्याला द्यावी आणि सर्व यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यान्वित आणावी. सोबतचरुग्णांसाठी आवश्यक असलेली रेमेडिसवर इंजेक्शन गरीब रुग्णांना द्यावी, अशी 150 इंजेक्शन्स त्यांनी तुपे यांच्याकडे सुपूर्त केली.
या बैठकीला खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी महापौर अंकुश काकडे, दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ उपस्थित होते.