नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या नियमित उपचारासाठी काल रात्री अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधींही अमेरिकेला गेले असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे आधीच त्यांच्या उपचारास विलंब झाल्याचे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी माहिती दिली.
Ahead of monsoon session, Sonia leaves abroad for medical check-up; Rahul accompanies her
Read @ANI Story | https://t.co/AobQkrsQXx pic.twitter.com/YEbmp3gl28
— ANI Digital (@ani_digital) September 12, 2020
उपचारासाठी सोनिया गांधी अमेरिकेला गेल्या असल्याने त्या पावसाळी अधिवेशनास उपस्थित राहू शकणार नाहीत. त्या दोन आठवड्यांनी परतणरा असल्याची माहिती आहे. तर राहुल गांधी एक आठवड्यांनी अमेरिकेवरून परतल्यानंतर पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमेरिकेला रवाना होण्याआधीच एक दिवसापुर्वी सोनिया गांधींनी पक्षात अनेक फेरबदल केले असून, गुलाम नबी आझाद आणि खरगे यांना महासचिवपदावरून हटविण्यात आले आहे.