कोरोनाच्या पार्श्वभूमीवर NEET आणि JEE परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय. त्यातच आता भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.
नुकतंच मी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान NEET आणि इतर परिक्षा दिवाळी नंतर घेतल्या गेल्या पाहिजेत असं सूचवलं आहे. या परिक्षांची तारिख निश्चित करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर सोपवलं आहे. यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये. शिवाय या मी याबाबत पंतप्रधानांना देखील पत्र लिहिणार आहे.’असल्याचे स्वामी यांनी सांगितले . दरम्यान JEE Main 1 ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान तर NEET ची परिक्षा 13 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.