मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बीकेसी येथील जम्बो कोव्हिड सेंटरमधील डॉक्टर, परिचारिका व संबंधित रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना भेटून महापौर किशोरी पेडणेकर यांनी विशेष कौतुक केले आहे. मे महिन्यापासून बीकेसी कोव्हिड फेज वनमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण दाखल झाले. या सर्व रुग्णांवरून यशस्वीरित्या उपचार करण्यात आले असून, एकाही रुग्णाचा सेंटरमध्ये मृत्यू झाला नाही.
फेज वनमध्ये आतापर्यंत 10 हजार 17 रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहे. त्यापैकी 9 हजार 145 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोव्हिड सेंटरमध्ये दाखल झालेला रुग्णांपैकी एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. या कामगिरीसाठी महापौरांनी कोव्हिड सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे स्वतः भेटून कौतुक केले.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटरमधून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांशी संवाद साधला. बीकेसीमधील जम्बो कोव्हिड सेंटर येथे बायोसेफ्टी तीन श्रेणीतील वायरस इम्मुनोलॉजी टेस्टिंग लॅब कंटेनरमध्ये नव्याने स्थापन करण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले.