मुंबई: केंद्र सरकारकडून मुंबई महापालिकेला तब्ब्ल १ लाख ५८ हजार लसींचा पुरवठा झालेला होता. या मध्ये १ लाख ५० हजार लस या कोव्हिडशील्ड आहेत तर बाकीच्या ८ हजार लस कोवॅक्सिन आहेत. सदर लसींचा साठा हा महापालिकेच्या कांजूरमार्गच्या जवळ असलेल्या प्रादेशिक लसीकरण साठवण केंद्रात ठेवलेला होता. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले होते. मुंबईकरांनी लसीकरणाला भरगोस प्रतिसाद दिला आणि १ लाख ५० हजार लस या एकाच दिवसात वितरित करण्यात आल्या आणि आता मुंबई मधील लसीकरण केंद्रे पुन्हा एकदा बंद पडली आहेत.
तसेच १ मे पासून होणाऱ्या १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस मोफत मिळणार नाही अशी माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. अनेक राज्यांनी १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं मोफत कोरोना लसीकरण करण्याची घोषणा केली आहे . महाराष्ट्रातही सध्या याबाबत विचार सुरू आहे . पण अद्याप निर्णय झालेला नाही. राज्य सरकार मोफत कोरोना लस देणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही . अशात मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणाबाबत मात्र मोठा निर्णय घेतला आहे. १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना १ मेपासून कोरोना लस दिली जाणार आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ही लस मिळेल. खासगी रुग्णालयात लस घेणाऱ्यांना त्याचे पैसे द्यावे लागतील आणि आता मुंबई महापालिकेने १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना खासगी रुग्णालयातच लस घेता येईल अशी घोषणा केली आहे.
महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं, 18 ते 45 वयोगटातील मुंबईत जवळपास 9 दशलक्ष नागरिक आहेत. त्यांचं लसीकरण करण्यासाठी जवळपास 1.80 कोटी लशीच्या डोसची गरज आहे. लसीकरण मोहिमेची व्याप्ती, लशीचा पुरेशा साठा, मागणी, वाहतूक आणि पुरवठा आणि लसीकरण केंद्र या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. याबाबत सरकार आणि लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर लसीकरणाची पुढची दिशा ठरेल. हे वाचा – तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना महापालिका आणि सरकारी केंद्रात लस दिली जाईल. पण 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मुंबईतील खासगी रुग्णालयातच लस घेता येईल, असं चहल यांनी सांगितलं.
कोण आहेत मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल (Who is BMC commissioner Iqbal Chahal)
इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत
सध्या इक्बाल चहल हे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत
इक्बाल चहल यांनी यापूर्वी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलं आहे
इक्बाल हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते
वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे
केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव आणि ओसडी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
इक्बाल चहल हे औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही होते
शिवाय त्यांनी उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून काम पाहिलं
म्हाडाचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे
इक्बाल यांचं शिक्षण राजस्थानातील जोधपूर इथं झालं आहे
इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट अधिकारी म्हणून ओळखले जातात
इक्बाल चहल हे 2004 पासून सलग मुंबई मॅरोथॉनमध्ये सहभागी होतात.