मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची आज खलबते झाली. पहिल्या टप्प्यात दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा निवडणूक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
स्वतःची काळजी घेत जनतेची कामे करा. महापालिका निवडणुकिसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे. त्यासाठी आतापासून कामाला लागा. आपण कुठे कमी पडलो हे पाहा आणि अधिक जोमाने कामाला लागा, विरोधक काय बोलतायत त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तयारीला लागा. त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असा आदेश ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचे सांगण्यात आले.