मुंबई : कंगनाच्या ऑफिसवर आज मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवायला सुरुवात केली होती. पालिकेने कंगनाला ऑफिस अनधिकृत असल्याची नोटीस काल दिल्यानंतर पालिकेने आज कंगनाच्या ऑफिसवर तोडफोड करायला सुरुवात केली होती.मात्र त्यानंतर कंगनाने न्यायालयात धाव घेत पालिकेच्या कारवाईला स्थगिती आणली.
कंगनाने मुंबईतल्या घरी पोहचताच एक व्हिडीओ केला आहे. त्यामध्ये तिने थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज माझं घर तुटलं आहे उद्या उद्धव ठाकरे तुझा अहंकार तुटेल अशा प्रकारे एकेरी नावाने उल्लेख करत कंगनाने मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाली नेमकं कंगना
उद्धव ठाकरे तुला काय वाटत फिल्म माफियांसोबत मिळून माझे घर तोडून तू मोठा बदला घेतला आहेस ?
आज माझं घर तुटलं आहे उद्या उद्धव ठाकरे तुझा अहंकार तुटेल
लक्षात ठेव वेळ आधीच सारखी नसते
तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत,कारण मला काश्मिरी पंडितांवर झालेले अन्याय अनुभवायला मिळाले
आज मी देशाला एक वचन देते ज्याप्रमाणे मी अयोध्येवर चित्रपट बनवत आहेत त्याप्रमाणे काश्मीरवर देखील बनवेल आणि देशवासियांना जागृत करत राहील.
तुमने जो किया अच्छा किया 🙂#DeathOfDemocracy pic.twitter.com/TBZiYytSEw
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
Read Also
कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बाबत शरद पवार म्हणतात . .https://t.co/fmbsdbVZ7i@PawarSpeaks @mybmc @KanganaTeam
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 9, 2020