केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना गो’ अशी घोषणा दिली होती आता तेच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. मंगळवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आठवले यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. कफ आणि अंगदुखीच्या तक्रारीनंतर आठवले यांची सोमवारी कोरोना टेस्ट झाली होती.
अभिनेत्री पायल घोषला त्यांच्या पार्टीत प्रवेश देण्यासाठी सोमवारी आठवलेंनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी तोंडावरचा मास्क खाली केला होता. त्यामुळेच त्यांना कोरोना झाल्याची शक्यता असल्याची चर्चा होत आहे. याबाबतचा एक फोटो देखील व्हयरल झाला होता.
दरम्यान, देशात कोरोना संक्रमणाचा धोका वाढत असताना रामदास आठवले यांनी एप्रिल महिन्यात ‘गो कोरोना गो’चा नारा दिला होता. त्यांचा हा नारा कोरोना काळादरम्यान खूप व्हायरल झाला होता.
तसेच महाराष्ट्रात राजकारणातील अनेकांना कोरोनाने विळखा घातला आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवारही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्यावर ब्रीज कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली ते आयसोलेशनमध्ये आहेत.