मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर, आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची राज्य सरकारकडून अंमलबजावणी सुरु असून, राज्यात ५ एप्रिपासून नवीन करोना प्रतिबंधक नियमावली लागू केली आहे.
या नियमावलीमुळे सामान्य जनतेचे जीवनचक्र पुन्हा मंदावले असून, लॉकडाऊनला घेऊन नागरिकांमधून संमिश्र भावना उमटत आहेत. अनेक क्षेत्रांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसंच शिक्षण क्षेत्रालाही या मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना संदेश देत संगितले होते की, ‘विद्यार्थ्यांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीही आपण निर्णय घेतले आहेत. देशातील मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत (RTE) या विद्यार्थ्यांचं वार्षिक मूल्यमापन करणे आवश्यक आहे. मात्र, यंदाही राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीमुळे, ते शक्य नाही’, असे सांगत त्यांनी पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील, राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती सरकारला केली आहे. यामध्ये त्यांनी एमपीएससीच्या परीक्षांचाही उल्लेख केला आहे.
त्यांनी ट्विट करत लिहिले आहे की, “सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी, विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो.” यावेळी त्यांनी आपल्या ट्वीटसोबत #MPSC आणि #MHUEXAM असा हॅशटॅगही वापरला आहे.
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, या महिन्यात होणारी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा सुद्धा समोर ढकलण्यात यावी , याबाबद्दल सुद्धा तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.#muhs #muhsexam #muhsexampostpone— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2021
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो.#mpscexam #mhuexam
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 8, 2021