पुणे : देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. लोकप्रतिनिधींना देखील या आजाराची लागण होत असल्याचे समोर आले आहे. आता वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
On noticing initial symptoms, I have tested positive for #COVID19. My symptoms are mild, but I have been hospitalized as a precaution. I request all those who have come in contact with me in the last few days to be extra vigilant of symptoms and self-isolate as a precaution.
— Sunil Tingre (@suniltingre) September 2, 2020
आमदार सुनील टिंगरे यांनी माहिती दिली की, लक्षणे आढळल्यानंतर चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे.
मागील काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी देखील विशेष काळजी घ्यावी व लक्षणे असल्यास सेल्फ क्वारंटाईन व्हावे, अशीही विनंती टिंगरे यांनी केली आहे.
टिंगरे हे वडगावशेरी मधील गणेशनगर येथे झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी कोणताही सोशलडिस्ट्न पाळला गेला नव्हता.