मुंबई : ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे.
‘माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. पण माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी, सुरक्षित राहा, काळजी घ्या असं त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.
दरम्यान काही दिवसांपासून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल आहेत. विधानसभा अधिवेशनाआधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस विदर्भात पूरपरिस्थितीचा आढावा आणि विविध कामांसंबंधी दौरे केले.
Read Also :