पुणे : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत चांगलीच चर्चेत होती. कंगनाने शिवसेनेला डिवचल्यानंतर मुंबई सोडण्यापूर्वी राज्यपालांची भेट घेतली होती. पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी याच भेटीचा संदर्भ देत मलाही वाटू लागलंय काही वेळ मोकळा असतो तर यावं राज्यपालांना भेटून अशा आशयाचे उपरोधिक एक ट्विट केले आहे.
मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सतत रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतात. काही दिवसांपूर्वी मोरे यांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्याची गाडी फोडून रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याचा निषेद व्यक्त केला होता.
मोरे यांनी आता ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यामध्ये ते म्हणतात, त्या कंगनाचे अनधिकृत ऑफिस तोडले तर ती मा. राज्यपाल साहेबांना भेटायला गेली, मग मी तर जे केलं ते जनतेसाठी केलंय…तरी माझ्यावर इतके गुन्हे दाखल झालेत,मला ही वाटू लागलंय सध्या काही वेळ मोकळा असतो…यावंच राज्यपाल साहेबांना भेटून…
त्या कंगनाचे अनधिकृत ऑफिस तोडले तर ती मा. राज्यपाल साहेबांना भेटायला गेली,
मग मी तर जे केलं ते जनतेसाठी केलंय…
तरी माझ्यावर इतके गुन्हे दाखल झालेत,
मला ही वाटू लागलंय सध्या काही वेळ मोकळा असतो…
यावंच राज्यपाल साहेबांना भेटून…
काय म्हणता…🤔 pic.twitter.com/4GJ0fPUTrX
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) September 14, 2020