मुंबई : पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्टवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे . या भेटी मगच कारण अद्याप अस्पष्ट आहे.
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची 26 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ते एकत्र होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली.
“शिवसेनेत गुप्त बैठक करण्याची पद्धत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ती काही भूमिगत बैठक नव्हती, आम्ही बंकर किंवा तळघरामध्ये भेटलो नव्हतो. त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती” असे संजय राऊतांनी सांगितले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची रविवारी भेट झाली होत होती. त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापार्शवभूमीवर आज शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यात झालेल्या बैठकीवरून अनेक तर वितर्कांना उधाण आले आहे.