बीड :कोरोनाच्या या संकटाचा सर्वच गोष्टींना फटका बसला आहे. सणासुदीबारोबरच सार्वजनिक कार्यक्रमांना देखील याचा फटका बसला आहे. त्यामुळे यावर्षी गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याला देखील याचा फटका बसला आहे. यावर्षी गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमाला याचा फटका बसला असून यंदा गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम होणार नाही. याविषयी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडें यांनी माहिती दिली असून कोरोनाच्या संकाटामुळे गर्दी टाळून सर्वानी आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी गोपीनाथ गडावर 12 डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाऐवजी सामाजिक भान म्हणून रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले. सोशल मीडियातून याविषयी त्यांनी मॅसेज दिला असून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि 12 डिसेंबर हा जन्मदिवस साजरा करावा, असं आवाहन त्यांनी केले आहे. याविषयी माहिती देताना त्यांनी म्हटले कि, यावर्षी मोठा कार्यक्रम होणार नाही.
दरवर्षी या दिवशी गोपीनाथ गडावर भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी आणि जन्मदिवशी म्हणजेच 3 जून आणि 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. या गडावर मोठे नेते, मंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे आदींनी उपस्थित राहून संघर्षाच्या या जीवन प्रवासाला आदरांजली अर्पण केली. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटात यावर्षी कार्यक्रम होणार नाही.
कार्यकर्त्यांना केले आवाहन
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कुणीही गर्दी करू नये. 12 ते 15 डिसेंबर या कालावधीत रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करून सामाजिक भान राखावे. त्याचबरोबर केवळ रक्तदान शिबिरचा आयोजित करण्याचे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखिले त्यांनी कार्यकर्त्याना केले. मी स्वतः 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी गडावर दर्शन घ्यायचे आहे. त्याचबरोबर मुंडे साहेबांच्या जन्मदिवशी असे समर्पित कार्यक्रम घ्यावेत व त्याचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर टाकण्याचे देखील आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.