कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र भाजपच्या वतीने आज राज्यभरामध्ये मंदिरे खुली करण्यासाठी जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितीश राणे यांनी सरकारच्या या धोरणाचा तीव्र शब्दात निषेद केला.
आम्ही आघाडीसरकार विरोधात हे आंदोलन करत आहोत. सरकारने दारूची दुकाने खुली केली आहेत तसेच बाकी इतर गोष्टीही खुल्या केल्या आहेत त्याचप्रमाणे सरकारने मंदिर देखील खुली करावीत अशी मागणी यावेळी भाजप खासदार नारायण राणे यांनी केली.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंदिरापासून नेमका काय त्रास होतोय असा सवाल देखील यावेळी राणे यांनी उपस्थित केला. मंदिर बंद ठेवण्याचं कारण तरी आम्हाला कळू द्या ? असे देखील राणे यावेळी म्हणाले. सर्व देव देवतांची मंदिर त्वरित खुली करावी यासाठीच हे आंदोलन करत असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
#दार_उघड_उद्धवा_दार_उघड pic.twitter.com/29LFVfgTP1
— nitesh rane (@NiteshNRane) August 29, 2020
हे देखील वाचा
'रोहित पवारांनी नीट अभ्यास करून बोलावं', फडणवीसांचा टोलाhttps://t.co/joD51EjBY6
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 29, 2020