बुलडाणा : अतिवृष्टी, कांदा प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दौरे करत आहेत. पवार साहेबांबद्दल कौतुक असले तरी पण म्हाताऱ्या बापाला का फिरावं लागतं?, जेव्हा पोरं निकम्मी असतात, तेव्हा म्हाताऱ्या बापाला बाहेर फिरावं लागतं, शरद पवारांच्या दौऱ्यांमुळे हे सरकार लायकीचे नसल्याचे स्पष्ट होते”, अशी टीका माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली. कपटीपणा करुन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत आले आहेत, त्यांनी सरकार चालवून दाखवावे, असं आव्हान बोंडे यांनी दिले आहे.
राज्याच्या सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे, हे भाजपा ने कधीच म्हटले नाही. मात्र, कपटीपणाने सत्तेवर आला आहात तर सरकार चालवून दाखवा. जनतेची कामे करा, जे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते ते पूर्ण करा, असं आव्हान अनिल बोंडे यांनी राज्य सरकारला दिले.
अतुल भातखळकरांच टीकास्त्र
शरद पवारांच्या शिवसेनेवरील टिकेवरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केलीय. महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं होत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी रात्री जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला होता. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत गेले ३०-३५ वर्ष आपण हे एकत असल्याचं म्हटलं होतं. “सोनारानंच कान टोचले हे बरं झालं,” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही राज्य सरकारवर टीका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. कदाचित मी खुर्चीत बसतो. तुम्ही सत्ता चालवण्याचं कंत्राट घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितलं असेल. तसा त्यांच्यात करार झाला असेल, अशी बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Read Also ;
सरकार शरद पवार नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच चालवतात, शिवसेनेची प्रतिक्रियाhttps://t.co/jvQegArMTz @samant_uday @ShivSena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020