मुंबई: भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक झाली. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडलीय. घटनेनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, तसेच जेव्हा हातातली सत्ता जाईल तेव्हा, फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, असा गर्भित इशारा देत तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, अशी धमकीच निलेश राणेंनी दिली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. pic.twitter.com/t1KVXLgO2Y
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 30, 2021
‘गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही’
घोंगडी बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा 4 ते 5 लोक होते. मात्र, अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. माझं इथं कुणाशीही शत्रुत्व नाही, तरीसुद्धा माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असेल तर माझा आवाज बंद होणार नाही. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांवर टीका, संध्याकाळी गाडीवर दगडफेक
“शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” अशी जहरी टीका पडळकर यांनी बुधवारी सकाळी केली. सोलापुरात बोलताना त्यांनी पत्रकार परिषदेत पवारांवर हल्ला चढवला. तसंच पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी होत असलेल्या बैठकीवर त्यांनी शेलक्या शब्दात लक्ष्य केलं. रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात, अशा शब्दात पडळकर पवारांवर तुटून पडले.