भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये सध्या पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि निवडणूक आयोगाने त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द केल्याने चर्चेत आहे. एका सभेत भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया कमलनाथ यांनी आपल्याला कुत्रा म्हटल्याचा आरोप केला. सोबतच या टीकेला प्रत्युत्तर देखील त्यांनी दिले.
#WATCH: Kamal Nath ji calls me a dog, yes I am a dog because I am a servant of the people… because a dog protects its owner and if someone brings corrupt and ill-intended policies then this dog will attack that person: BJP leader Jyotiraditya Scindia #MadhyaPradesh pic.twitter.com/UyY4xQHdZl
— ANI (@ANI) October 31, 2020
कमलनाथ यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, कमलनाथ यांनी म्हटले की मी कुत्रा आहे. होय…, कमलनाथ यांनी ऐकावं. मी कुत्रा आहे कारण माझा मालक माझी जनता आहे, जिची सेवा मी करतो आहे. होय कमलनाथ मी कुत्रा आहे कारण कुत्रं आपल्या मालकाचं रक्षण करत असतं.
कमलनाथ जी, मी कुत्रा आहे. कारण जर कोणी माझ्या मालकावर बोट दाखवेल आणि मालकाशी भ्रष्टाचार आणि विनाशकारी धोरण दाखवेल तर हा कुत्रा त्याला चावेल. मला अभिमान आहे, की मी जनतेचा कुत्रा आहे, अशा शब्दात त्यांनी टीकेला उत्तर दिले.
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी भाजप आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू असल्याने चुरस वाढली आहे.