‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन 2020’ च्या सर्वेक्षणात देशात सर्वात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहे. योगी आदित्यनाथ यांनी सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होण्याचा मान पटकवला आहे.
या सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना एकूण 24 टक्के मत् मिळाली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 15 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.
सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चौथ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातव्या क्रमांकावर आहेत. उद्धव ठाकरे यांना 7 टक्के मते मिळाली.