उत्तर प्रदेश : हाथरास बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळत असून युपी पोलिसांच्या वागणुकीवरून योगी सरकारवर टीका होत होती. त्यानंतर योगी सरकारने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या अगोदर आज उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी या कुटुंबाची भेट घेतली. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अवस्थी यांनी या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना दिले होते.
“आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि या घटनेतील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे त्यांना आश्वासन दिले. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. कुटुंबीयांचे जवाब देखील नोंदवून घेण्यात आलेले आहे.” असे या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अवस्थी म्हणाले होते.
तर, या अगोदर हाथरस घटनेवर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी “उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिलं जाईल, असे आदित्यनाथ म्हणाले आहेत.
Read Also :
‘पीडित कुटुंबाचा आवाज दाबू शकत नाही, अन्याया विरोधात आवाज उठवणार’ : राहुल – प्रियांकाची प्रतिक्रिया https://t.co/2jcx33aP9w #Hathras #RahulGandhi #PriyankaGandhi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 3, 2020