पार्थ पवार यांच्यावरील शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत भाष्य व्यक्त केले होते. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कुटुंब आदर्श असल्याचं म्हटलं आहे. तसेच शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्रित बसून हा विषय एका मिनिटात संपवतील, असाही विश्वास व्यक्त केला आहे.
काय म्हणालेत नेमकं राजेश टोपे
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या घरात एकोपच असतो.
माध्यमांनी याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करु नये.
शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं घर आदर्श घर आहे.
पार्थ पवार माझा मित्र आहे, शरद पवार त्यांना घरात बसून जे काही आहे ते सांगतात.
शरद पवार ज्येष्ठत्वाच्या नात्याने अधिकाराने काही बोलले असतील तर तो त्यांच्या घरातील मुद्दा आहे.
महाविकासआघाडी खूप चांगले चालले आहे. सगळेजण व्यवस्थित काम करत आहेत. हे सरकार 5 वर्षे चालणार आहे. त्यामुळे सरकार पडेल या विरोधकांनी केलेल्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.
rajesh tope comment on sharad pawar parth pawar issue