राज्यात कोरोना संसर्गाने वाढत्या रुग्णांना उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविडसेंटरमध्ये तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Thackeray Sarkar ₹1000 Crore Mega COVID Center Ghotala, utilisation 15%….want White Paper
ठाकरे सरकार चा ₹१००० करोडचा मेगा कोविड सेंटर घोटाळा, १५% वापर/उपयोग. श्वेत पत्रिका हवी @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @ShelarAshish pic.twitter.com/2f4Tb2NUOY
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 3, 2020
मेगा कोविड सेंटर उभं करण्याबाबत टेंडर प्रक्रिया कशा रितीनं राबवली, किती रुग्णांनी यामध्ये उपचार घेतले, कोविड सेंटर उभं करण्यासाठी किती खर्च आला या सर्व गोष्टींबाबत अनियमितता आहे, तक्रारी आहेत. हे महाकोविड सेंटर म्हणजे महाघोटाळा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.तसेच या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सोमय्या यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान कोविड सेंटर उभारण्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर चांगलेच धारेवर घेतल्याचे पाहायला मिळत आहे