IMPIMP
15 ministers are shocked by defeat, three union ministers from Maharashtra are sitting at home 15 ministers are shocked by defeat, three union ministers from Maharashtra are sitting at home

१५ मंत्र्यांना पराभवाचा धक्का, महाराष्ट्रातील तीन केंद्रीय मंत्री बसलेत घरी

मुंबई :  लोकसभा निवडणुकीत मोठे उलटफेर झाले असून भाजपने दिलेला चारशे पार चा नारा त्यांच्यात अंगलट आला आहे. देशाच्या ५४३ पैकी बहुमतासाठी २७२ जागाही भाजप मिळवण्यास अपयशी ठरली आहे. त्यामुळे भाजपची मदार आता मित्र पक्षांवर अवलंबून राहिली आहे. यातच या निवडणुकीत  स्मृती ईराणी, अर्जून  मुंडा, आर. के. सिंह यांच्यासह मोदी सरकारमधील १५ मंत्र्यांना पराभावाचा धक्का बसला आहे. पराभुत होणाऱ्या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा..“स्वत: ला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदींचा दारूण पराभव” 

स्मृती इराणी यांचा अमेठीमध्ये पराभव झाला आहे. अर्जून मुंडा यांचा खुंटी मतदारसंघात कॉंग्रेसच्या कालीचरण मुंडा यांनी लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने पराभव केलाय. बिहारच्या आरा मतदारसंघातून आर. के. सिंह यांचा माकपचे सुदामा प्रसाद  यांनी जवळपास ४५ हजारांपेक्षा पराभाव केला. चंदौली येथून महेंद्रनाथ पांडे तर उत्तर प्रदेशचे राज्यमंत्रई अजय मिश्रा टेनी साध्वी निरंजन ज्योती, भानुप्रतापसिंह वर्मा यांचाही पराभव झालाय.

हेही वाचा..कॉंग्रेसला मिळाल्या सर्वाधिक १३ जागा, नागपुरात लागले पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर 

महाराष्ट्रातून राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवार यांना पराभावाचा सामना करावा लागला आहे. तर पश्चिम बंगालमधून राज्यमंत्री निशइथ प्रामाणिक आणि सुभाष सरकार यांचाही पराभव झालाय. केरळमध्ये तिरूवंतपुरम येथून राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचा कॉंग्रेसचे शशी थरूर यांनी पराभव केलाय. अटींगलमधऊन व्ही. मुरलीधरन यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. तसेच राजस्थानमधून बाडमेर येथून कैलाश चौधरी पराभूत झालेत.

READ ALSO :

हेही वाचा..फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत, ठाकरे गटाच्या नेत्याने फडणवीसांना डिवचलं, म्हणाले..,

हेही वाचा..“बच्चा बडा हो गया”, सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं 

हेही वाचा…“मला सरकारमधून मोकळं करा”, फडणवीसांचं मोठं विधान, राज्यात राजकीय उलथापालथ ?? 

हेही वाचा…मोठी बातमी…! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा 

हेही वाचा..आता अजितदादा गटात होणार मोठा राजकीय भुंकप, १२ आमदारांची होणार शरद पवार गटात घरवापसी