नवीदिल्ली : तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपाचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये भाजपाच्या वतीने नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात येत होता. अंबात्तूर परिसरात होत असलेल्या या कार्यक्रमात जवळपास दोन हजार हेलियम गॅसचे फुगे हे आकाशात सोडण्यात येणार होते.
काल पंतप्रधान मोदींनी आपला 70 वा वाढदिवस साजरा केला नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाला आहे. यामध्ये भाजपाचे तब्बल 30 कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
हेलियम गॅसच्या फुग्यांचा मोठा स्फोट
फुगे आकाशात सोडण्याची जोरदार तयारी सुरू होती. मात्र त्याच दरम्यान अचानक स्फोट झाला आहे. तसेच भाजपाचे कार्यकर्ते या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेतेमंडळींचं स्वागत केलं जात होते. फटाके फोडण्यात येत होते. त्यावेळी हेलियम गॅसच्या फुग्यांचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे.
#WATCH Tamil Nadu: Over 30 BJP workers sustained minor injuries as helium balloons exploded during PM Modi's birthday celebrations on 17th September, in Chennai. pic.twitter.com/DnDIkx35YS
— ANI (@ANI) September 19, 2020