नगर : दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नगरमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचारांचा धडाका सुरू झाला आहे. उद्या याठिकाणी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी अजित पवारांची सभा पार पडली. त्यावेळी अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर जोरदार घणाघात चढवला आहे. त्यावर आता निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“अजित पवारांचा शिलेदार शरद पवारांच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय”,? एकच चर्चा
अजित पवारांनी एका सभेत माझ्या नादी लागून नकोस असा थेट इशाराच दिलाय. यावेळी अजित पवार म्हणाले की, निलेश बेटा, तु ज्या शाळेत शिकतो. त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तु जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझा मागे लागलो तर आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे कंड जिरवतो. तुझा असा कंड जिरवेन की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल. माझ्या नादील लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तु तर किस झाड की पत्ती. मी जोपर्यंत शांत आहे. तोपर्यंत शांत आहे.
हेही वाचा…मोहोळ की धंगेकर, पुणेकरांच्या मनात नेमकं काय ?
दरम्यान, अजितदादांनी निलेश लंके यांना आवाहन दिल्यानंतर निलेश लंके यांनी अजितदादांचे जुने व्हिडीओ ट्विट केले आहे. यावर धन्यवाद! दादा.. तुम्ही माझ्याविषयी नगर दक्षिण मतदारसंघात येऊन कितीही आक्रमक बोललात, तरी तुमच्या मनात माझ्याविषयी असणारे हे खरं प्रेम कधीही कमी होणार नाही. असं निलेश लंके यांनी म्हटलंय.
धन्यवाद! दादा..
तुम्ही माझ्याविषयी नगर दक्षिण मतदारसंघात येऊन कितीही आक्रमक बोललात, तरी तुमच्या मनात माझ्याविषयी असणारे हे खरं प्रेम कधीही कमी होणार नाही! pic.twitter.com/Dnvjf6qU5f— Nilesh Lanke – निलेश लंके (@Nilesh_LankeMLA) May 10, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“इंडिया अगेंन्स्ट करप्शनचा पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहिर”
हेही वाचा…“वेळ पडल्यास अभिनयातून ब्रेक घेणार,” त्यामुळेच कोल्हेंनी केलं असं विधान
हेही वाचा…“वेळ पडल्यास अभिनयातून ब्रेक घेणार,” त्यामुळेच कोल्हेंनी केलं असं विधान
हेही वाचा…“महात्मा बसवेश्वर यांनी पेरलेल्या लोकशाहीच्या बीजाचा आता झालाय वटवृक्ष”, श्रीरंग बारणे