नाशिक : सध्या अजित पवार गटात असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आमदार नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. नरहरी झिरवळ हे सध्या शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत. अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात त्यांचे फोटो देखील व्हायरल होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा…मोदींची शरद पवारांना ऑफर, शरद पवारांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
दिंडोरी तालुक्यातील तीसगाव येथील मारूती मंदिराच्या भुमिपुजन प्रसंगी हे सगळे नेते एकत्र आले होते. अक्षय तृतीय निमित्त तेथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे व अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ हेही सोबत असल्याने झिरवळांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्याची चर्चा झाली. मात्र तसे काही नसून ते केवळ भूमीपुजनातर्फे एकत्र आले होते अशी माहिती मिळत आहे.
हेही वाचा…मुरलीधर मोहोळ vs रवींद्र धंगेकर; पुणेकरांच्या मनात नेमकं काय ?
गतवर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर नरहरी झिरवळ हे अजित पवार यांच्यासोबत आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून झिरवळ यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे झिरवळ हे शरद पवार गटामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मागच्या लोकसभा निवडणुकीत नरहरी झिरवळ यांचा भारती पवार यांनी पराभव केला होता. मात्र सध्या राजकीय पक्ष फुटीनंतर त्यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. अशातच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ हे भास्कर भगरे यांचा प्रचार करत असल्याचा आरोप शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांनी केलाय. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोहोळ की धंगेकर, पुणेकरांच्या मनात नेमकं काय ?
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडकरांनी बारणेंसाठी कंबर कसली, भाजप दीड लाखाहून अधिक मताधिक्क देणार
हेही वाचा…“मोदी शहांकडून महाराष्ट्राला तोडण्याचा, लुटण्याचा प्रयत्न”
हेही वाचा..“त्यांनी फक्त वार्डाच्या निवडणुका लढल्यात अन्..,”बारणेंचं संजोग वाघेरेंना प्रत्युत्तर
हेही वाचा..“धर्माभिमानी, शिव-शंभूप्रेमी नागरिकांनी महायुतीला मतदान करा”, महेश लांडगे यांचं आवाहन