मुंबई : मुंबईतील लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा भाजपकडून आयोजित करण्यात आल्या आहेत. अशातच आता तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदारसंघात होत असलेल्या सभांमधून नरेंद्र मोदी हे ठाकरे गटाला नकली शिवसेना म्हणून डिवचत आहेत. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर पलटवार केलाय.
हेही वाचा…“पठ्ठ्या तु आमदारच कसा होतो, तेच बघतो,” शरद पवारांच्या नेत्याचा अजितदादांचं चॅलेंज
नंदुरबार लोकसभा महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्यासाठी नरेंद्र मोदींच्या सभा पार पडली. यासभेत मोदींनी ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणून उल्लेख केला. त्यावरून जेवढं भाजपचं औरंगजेबावर प्रेम उमाळून आलं आहे. इतकं प्रेम का आहे औरंगजेबावर. औरंगजेब एक शासक होता आणि महाराष्ट्रावर त्याने वारंवार हल्ले केले. हत्या केल्या, लुट केली. त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. त्यासंदर्भात इतिहास सांगितला पाहिजे की, औरंगजेबाचा जन्म कुठे झाला होता ? जसं आम्ही म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे हे सर्व महान योद्धे महाराष्ट्रात जन्मले असं गर्वानं म्हणतो. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सारख्या महान नेत्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. असा दावाही त्यांनी केलाय.
हेही वाचा…“मुरलीधर मोहोळांच्या रूपाने नरेंद्र मोदींना मत द्या”, पुण्यात फडणवीसांचं मतदारांना आवाहन
पुढे बोलतांना ते म्हणाले की, त्याचप्रमाणे एका औरंगजेबाचा जन्म ज्याने संपूर्ण देशावर आपली पकड मिळवण्याचा प्रयत्न करावा लागला आणि महाराष्ट्राशी संघर्ष केला होता त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला. त्यात मी चुकीचं काय बोललो? ज्या मातीत औरंगजेबाचा जन्म झाला तिथे जन्मलेल्या राज्यकर्त्यांना थोडा गुणधर्म लागला असेल. त्याप्रमाणे मोदी-शहा तशाप्रकारे हल्ले करत आहेत. महाराष्ट्राला तोडण्याचा, लुटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अशी विधानं कुणाला झोंबण्याचं कारण काय? मी तर काही कुणाला औरंगजेब म्हणालो नाही. औरंगजेब ही एक विकृती आहे. अशी टिकाही त्यांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा..“त्यांनी फक्त वार्डाच्या निवडणुका लढल्यात अन्..,”बारणेंचं संजोग वाघेरेंना प्रत्युत्तर
हेही वाचा..“धर्माभिमानी, शिव-शंभूप्रेमी नागरिकांनी महायुतीला मतदान करा”, महेश लांडगे यांचं आवाहन
हेही वाचा…मोदींची शरद पवारांना ऑफर, शरद पवारांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…मुरलीधर मोहोळ vs रवींद्र धंगेकर; पुणेकरांच्या मनात नेमकं काय ?
हेही वाचा…“विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल,” अजित पवारांनी शिरूरकरांसाठी दिली ग्वाही